कोरोना संकटामुळे लग्न पुढे ढकलेय, यंदा पावसाळ्यातही उडवा लग्नाचा बार

कोरोनाच्या संकटामुळे अनेक तरुण तरुणींनी बोहल्यावर चढण्याचा बेत पुढे ढकलला होता.  

Updated: Apr 23, 2020, 03:42 PM IST
कोरोना संकटामुळे लग्न पुढे ढकलेय, यंदा पावसाळ्यातही उडवा लग्नाचा बार title=

विशाल करोळे, औरंगाबाद : कोरोनाच्या संकटामुळे अनेक तरुण तरुणींनी बोहल्यावर चढण्याचा बेत पुढे ढकलला होता. अशा तरुणतरुणींनीसाठी आनंदाची बातमी. यंदा पावसाळ्यातही लग्नाचे मुहूर्त असल्याचं ज्योतिषाचार्यांनी जाहीर केलंय. त्यामुळं अनेकांना यंदाच बोहल्यावर चढता येणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्यापासून लॉकडाऊन पुकारण्यात आला. यामुळे बोहल्यावर चढणाऱ्या मंडळींची भलतीच अडचण झाली. अनेकांनी लग्न पुढच्या वर्षावर ढकलली किंवा अनेकांनी लग्नाचा बेतच रद्द केला. लग्नाळू मंडळींना दिलासा देणारी बातमी ही की यंदाच तुम्ही लग्न करु शकता. 

कोरोनामुळं आपातकालिन स्थिती निर्माण झाल्यानं श्रावण आणि भाद्रपद महिन्यातले गौण मुहूर्त योग्य असल्याचं ज्योतिषाच्यार्यांनी ठरवले आहे. त्यानुसार जून महिन्यात ८ लग्नाचे मुहूर्त आहेत. जुलै महिन्यात ११ लग्नाचे मुहूर्त आहेत. तर ऑगस्ट महिन्यात लग्नाचे ६ मुहूर्त आहेत, अशी माहिती वेदमूर्ती अनंत पाडंव गुरुजी यांनी दिली. ज्यांना लग्न याच वर्षी करायचंय त्यांच्यासाठी अडचण नाही. लॉकडाऊन उठल्यानंतरही लग्नाचे मुहूर्त आहेत. पावसाळा असला तरी पावसातही तुम्ही लग्नाचा बार उडवू शकता.