जैन मुनींनी सांगितले स्मरणशक्ती वाढवण्याचे रहस्य, मुख्यमंत्र्यांसमोर करूनही दाखवलं, कसं ते पाहाच!

Jainism Saint Saraswati Sadhana : जैन धर्माचे धर्मगुरु आणि जैन मुनी अजीतचंद्र सागर महाराज यांनी सरस्वती साधना शोधली आहे. या साधनेद्वारे अतिशय कठीण परिक्षाही मुलं सहज पास होतील. काय आहे ही साधना. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: May 2, 2024, 12:34 PM IST
जैन मुनींनी सांगितले स्मरणशक्ती वाढवण्याचे रहस्य, मुख्यमंत्र्यांसमोर करूनही दाखवलं, कसं ते पाहाच! title=

जैन धर्माचे प्रसिद्ध धर्मगुरू आणि वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी दीक्षा घेतलेले जैन भिक्षू अजितचंद्र सागर महाराज यांनी 'सरस्वती साधने'चा शोध लावला आहे. अनेक विक्रम त्यांच्या नावावर आहेत. तसेच जैन साधू अजितचंद्र सागर यांनी 8 वर्षे मौनव्रत पाळले होते. त्यांनी 23 आगमांतील 22 हजारांहून अधिक गाथा लक्षात ठेवल्या आहेत.

मुंबईत नुकताच जैन धर्माचे धर्मगुरु आणि जैन मुनी अजीतचंद्र सागर यांचा कार्यक्रम पार पाडला. या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. तसेच बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक सुभाष घई देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात 'सरस्वती साधना' शिकवण्यात आली. या साधनेने सुभाष घई खूप प्रभावित झाले. त्यांनी आपल्या सोशल मीडिया साईटवर खास पोस्ट शेअर केली आहे. 

सुभाष घईंची खास पोस्ट 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by SG (@subhashghai1)

सुभाष घई यांनी आपल्या पोस्टमध्ये 'सरस्वती साधना' याचा देखील उल्लेख केलाय. या साधनेबाबत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अजीतचंद्र सागर यांनी यावेळी 500 हून अधिक नंबर कसे मांडले, यावरुन ते थक्क झाले. जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी मनावर अधिराज्य गाजवत आहे , अशावेळी ही सरस्वती साधना प्रत्येक विद्यार्थ्याने शिकणे अत्यंत गरजेचे असल्याचं सुभाष घई सांगतात. 

काय आहे सरस्वती साधना? 

सामान्यपणे लोकांना 10 अंकाचा मोबाईल नंबरही लक्षात राहत नाही. अशावेळी हजारो लोकांच्या उपस्थितीत 500 गोष्टी एकाचवेळी लक्षात ठेवून त्या गोष्टी अगदीच त्याच क्रमात पुन्हा मांडणे, हे चमत्कारापेक्षा कमी नाही. जैन मुनी अजितचंद्र सागर मात्र याला चमत्कार मानत नाहीत. त्यांच्या म्हणण्यानुसार, ही एक साधना आहे. ही साधना कठीण तपस्या, योग आणि परिश्रमाने शक्य झालं आहे. 

गुरुदेव अजितचंद्र सागर यांनी संपूर्ण भारत आणि परदेशातील विद्याथ्यांच्या मानसिक विकासासाठी ही सरस्वती साधना शोधून काढली आहे. एक अशी साधना ज्या साधनेच्या मदतीने विद्यार्थी कोणत्याही परीक्षेत नापास होत नाहीत. जगभरातील 50 हजाराहून अधिक भारतीय विद्यार्थ्यांनी या साधनेचा लाभ घेतला आहे. आतापर्यंत या साधनेचा लाभ भारत आणि भारता बाहेरील अनेक विद्यार्थ्यांनी  घेतला आहे. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी या साधनेची नक्कीच मदत होईल,