Loksabha Election 2024 : 'कामासाठी जाताच पक्षप्रवेश करून घेतला' ठाकरे गटातील नेत्याकडून एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप

Loksabha Election 2024 : कामासाठी गेले अन् शिंदे गटाचे झाले... ठाकरे गटातील नेत्यानं एका दिवसात दोनदा पक्ष बदलला, त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं? पाहा Video   

सायली पाटील | Updated: May 2, 2024, 08:43 AM IST
Loksabha Election 2024 : 'कामासाठी जाताच पक्षप्रवेश करून घेतला' ठाकरे गटातील नेत्याकडून एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप  title=
Loksabha Election 2024 kalyan purushottam chavhan on eknath shindes shivsena latest political updates

Loksabha Election 2024 : राज्याच्या राजकारणात लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर क्षणाक्षणाला काही घडामोडी घडत आहेत. जिथं कार्यकर्त्यांनी प्रचारासाठी दिवसरात्र एक केला आहे तिथं मोठे नेते त्यांच्या पक्षाची ताकद कशी वाढवता येईल यासाठीच प्रयत्न करताना दिसत आहेत. यामध्ये नेत्यांकडून विरोधी गटातील काही चेहऱे आपल्या बाजूनं वळवण्यासाठीचे प्रयत्नही सुरु असल्याचं स्पष्ट होत आहे. अशाच प्रयत्नांत असणाऱ्या शिंदे गटावर शिवसेनेच्या ठाकरे गटातील नेत्यानं गंभीर आरोप केले आहेत. 

कामासाठी गेले अन् शिंदे गटाचे झाले... 

कल्याणमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटातील माजी नगरसेवक पुरुषोत्तम चव्हाण यांनी (Eknath Shinde) एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केला. कामासाठी गेलो असता थेट पक्षप्रवेश करुन घेतल्याचा आरोप चव्हाणांनी केला. चव्हाण यांनी एक दिवसापूर्वीच शिंदे गटात प्रवेश केला होता. मात्र त्यांनी लगेचच घरवापसीही केली. ज्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी नेमकं काय घडलं हे सांगताना हा आरोप केला. या प्रकारनंतर महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली. नेतेमंडळींना त्यांनी या सर्व प्रकाराच्या धर्तीवर सावध राहण्याचाही इशारा दिला. दरम्यान शिंदे गटानं मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावत हे षडयंत्र असल्याचा आरोप केला. 

हेसुद्धा वाचा : अरे देवा! कोकण रेल्वेवर तब्बल 28 दिवसांचा मेगाब्लॉक; 'या' ट्रेनचा होणार खोळंबा