Live Concert मध्येच अरिजीत सिंगनं कापली नखं, Video पाहताच भडकले चाहते; 'हा काय प्रकार?'

Arijit Singh : गायक अरिजीत सिंग लाईव्ह कॉन्सर्टकरिता दुबईला गेला होता. यावेळी त्याने केलेला एक प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. चाहते देखील भडकले आहेत. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: May 9, 2024, 11:17 AM IST
Live Concert मध्येच अरिजीत सिंगनं कापली नखं, Video पाहताच भडकले चाहते; 'हा काय प्रकार?' title=

 अरिजीत सिंग त्या गायकांपैकी आहे ज्याची गाणी जगभर लोकप्रिय होतात. त्याचे चाहते संपूर्ण जगभर पसरलेले आहेत. याच कारणामुळे सलमान खानने देखील झालेला सगळा प्रकार विसरुन अरिजित सिंगसोबतचं वागणं मवाळ केलं आहे. पण पुन्हा एकदा अरिजीत सिंग विचित्र कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

अरिजित सिंगने दुबईच्या एका कॉन्सर्टमध्ये असं काही केलं आहे की, जाहते त्याच्यावर चांगलेच भडकले आहेत. अरिजीतला टिका करुन अनेकांनी अनप्रोफेशनल असल्याचं देखील म्हटलं आहे. 

नेमका काय झाला प्रकार?

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Believe in Arijit Singh (@believeinarijit)

अरिजीत सिंग दुबईमध्ये एका कॉन्सर्टकरिता गेला होता. तेथे गाणं गाताना अचानक तो स्टेजवर परफॉर्म करताना नेलकटरने नख कापताना दिसला. यावेळी तेथे उपस्थित चाहते नाराज झाले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहून हैराण झाले आहेत. अनेकजण अरिजीत सिंगचं हे वागणं अनप्रोफेशनल असल्याचं सांगतात. 

चाहत्यांना अजिबात आवडला नाही हा प्रकार 

सध्या अरिजीत ट्रोलच्या निशाण्यावर आहे आणि यापूर्वी असे क्वचितच घडले आहे. अनेकदा जेव्हा अरिजितला त्याचे वैयक्तिक आयुष्य सामान्य लोकांप्रमाणे जगताना दाखवले जाते, तेव्हा त्याची शैली पाहून लोक त्याची प्रशंसा करतात. यावेळी जे घडले ते लोकांना अजिबात आवडले नाही.

अरिजीतच्या या वागण्याचं झालं होतं कौतुक 

सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. बुधवारीच पश्चिम बंगाल येथील मुर्शिदाबाद येथे अरिजीत सिंगने मतदान केलं. यावेळेची अरिजीत सिंगची कृती चर्चेचा विषय ठरली. अरिजीत सिंह पत्नी कोयल रॉयसोबत स्कूटीवरुन आला आणि त्याने मतदान केलं. अरिजीत सिंगचं  हे सामान्य वागणं अनेकदा कौतुकास्पद असतं. पण यावेळी नखं कापण्याचा प्रकार मात्र नकारात्मक पद्धतीने चर्चेत राहिला. 

अरिजित सिंग स्वतः मतदान करण्यासाठी स्कूटरवरून मतदान केंद्रावर पोहोचले. त्याची पत्नी कोएल त्याच्या मागच्या सीटवर बसली होती. दोघेही अगदी साध्या लूकमध्ये मतदान केंद्रावर पोहोचले होते. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, अरिजीत स्कूटीवर मतदान केंद्रावर येतो, पत्नी कोयलचा हात धरून आत जातो. तेवढ्यात मध्येच एक व्यक्ती येतो आणि बायकोशी बोलतो, पण अरिजित सिंग येतो आणि हसत हसत बायकोला घेऊन जातो. यानंतर दोघेही मतदान करताना वाट बघताना दिसत आहेत.