भर मैदानात केएल राहुलवर भडकणारे संजीव गोयंका कोण आहेत? पाहा किती आहे संपत्ती

Sanjiv Goenka Net Worth : आयपीएलच्या 57 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने लखनऊ सुपर जायंट्सचा तब्बल 10 विकेटने धुव्वा उडवला. या पराभवानंतर मैदानावरचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यात लखनऊ संघाचे मालक चांगलेलच संतापलेले दिसत आहेत. 

राजीव कासले | Updated: May 9, 2024, 02:36 PM IST
 भर मैदानात केएल राहुलवर भडकणारे संजीव गोयंका कोण आहेत? पाहा किती आहे संपत्ती title=

Sanjiv Goenka Net Worth : आयपीएलच्या (IPL 2024) 57 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सला आतापर्यंतच्या सर्वात लाजीरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. सनरायजर्स हैदराबादने (SRH) लखनऊचा (LSG) दहा विकेट आणि दहा षटकं राखून पराभव केला. लखनऊच्या या पराभवानंतर मैदानावर एक घटना घडली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. लखनऊ सुपर जायंट्सच्या पराभवानंतर संघाचे मालक संजीव गोयंका (Sanjiv Goenka) चांगलेच संतापलेले दिसले. भर मैदानात गोयंका केएल राहुलवर (KL Rahul) संतापताना दिसताय. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

कोण आहेत संजीव गोयंका?
संजीव गोयंका हे भारतातले प्रसिद्ध उद्योगपती आहेत. देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत संजीव गोयंका यांचा समावेश होता. RPSG ग्रुपचे ते अध्यक्ष आहेत. विविध क्षेत्रात गोयंका समुहाचा उद्योग पसरला आहे. यात पॉवर, कार्बन ब्लॅक, आयटीईएस, कन्झ्युमर अँड रिटेल, मीडिया अँड एंटरटेनमेंट, स्पोर्ट्स, एज्युकेशन अँड  इन्फ्रास्ट्रक्चर अशा विविध उद्योगात गोयंका समुह काम करतं. त्यांच्या अनेक कंपन्यांमध्ये  50,000 हून अधिक कर्मचारी आहेत. 

संजीव गोयंका यांची संपत्ती
फोर्ब्स बिलेनिअर्स इंडेक्सच्या (Forbe's Billionaires Index) आकडेवारीनुसार आरपीएसजी ग्रुपचे अध्यक्ष संजीव गोयंका यांची एकूण संपत्ती (Sanjiv Goenka Net worth) जवळपास 3.5 अरब डॉलर इतकी आहे. गोयंका समुहाची कमाई जवळपास 4.3 अरब डॉलर इतकी असून कंपनीचं हेडक्वार्टर कोलकातामध्ये आहे. अरबपती संजीव गोयंका यांचा मुलाक शाश्वत गोयंका हे सुद्धा वडिलांच्या व्यापारात हातभार लावतात. शाश्वत गोयंका RPSG समुहाची सुपरमार्केट चेन स्पेन्सर अँड सॅन्क्स ब्रँड Too Yumm ची जबाबदारी सांभाळतात. 

स्पोर्टसमध्ये किती गुंतवणूक
संजीव गोयंका यंनी आयपीएल फ्रँचायजी लखनऊ सुपर जायंट्समध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. लखनऊ संघासाठी त्यांनी तब्बल 7,090 कोटी रुपये मोजले आहेत. आयपीएलच्या इतिहासातील हा दुसरा महागडा संघ आहे. याशिवाय केएल राहुलसाठी लखनऊने 17 कोटी रुपये बोली लावलीय. केवळ क्रिकेटच नाही तर फुटबॉल लीगमध्ये गोयंका समुहाने पैसे गुंतवले आहेत. संजीव गोयंका यांच्याकडे एटलेटिको डि कोलकाता (ATK) फुटबॉल क्लबची मालकी आहे.

संजीव गोयंका का आले चर्चेत?
संजीव गोएंका सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. 8 मार्च 2024 ला हैदाराबादमध्ये झालेल्या सनरायजर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्सच्या सामन्यात लखनऊला 10 विकेटने पराभव पत्करावा लागला. लखनऊने हैदराबादसमोर विजयासाठी 166 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान हैदराबादने अवघ्या 10 षटकात एकही विकेट न गमावत पार केलं. ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्माने लखनऊच्या गोलंदाजांची अक्षरश पिसं काढलं. या पराभवानंतर संजीव गोयंकांनी एलसजीचा कर्णधार केएल राहुलला चांगलाच झापलं. या दोघांमधला वाद कॅमेरात कैद झाला आहे. संजीव गोयंका यांच्या वर्तणुकीवर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.