'तुझा अभिमान वाटतो...', जेव्हा सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला कडकडून मारली मिठी

सिद्धार्थ जाधव

मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव सध्या प्रसिद्धीच्या उंचीवर आहे. अनेक सिनेमांमधून सिद्धार्थने आपल्या कामाची आणि अभिनयाची छाप सोडली आहे.

स्वतंत्र ओळख

सिद्धार्थ जाधव याने मराठी सिनेमासह हिंदी सिनेसृष्टीत देखील स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

मराठीत कॉमेन्ट्री

अशातच आता सध्या सुरू असलेल्या आयपीएलच्या सामन्यांमध्ये सिद्धार्थ जाधव मराठीत कॉमेन्ट्री करताना दिसला.

सुरेश रैना

त्यावेळी त्याची टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि मिस्टर आयपीएल सुरेश रैना याच्याशी भेट झाली. त्याचा व्हिडीओ अभिनेत्याने शेअर केलाय.

हॅडशेक

सिद्धार्थने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसतंय, की सुरेश रैना आणि सिद्धार्थने एकमेकांशी गप्पा मारल्या अन् हॅडशेक देखील केला.

भेटून आनंद झाला

रैनाने सिद्धार्थची गळाभेट देखील घेतली. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्याने रैनाचं कौतूक केलं. सर तुम्हाला भेटून आनंद झाला, असं सिद्धार्थ म्हणतो.

कौतुक केल्याबद्दल आभार.

आपल्या क्रिकेट टीममधील उत्तम खेळाडू आणि विनम्र व्यक्ती आहे. माझ्या कामाचं कौतुक केल्याबद्दल आभार.. आम्हाला तुमचा अभिमान वाटतो.

हार्ट इमोजी

सिद्धार्थने शेअर केलेल्या व्हिडीओवर सुरैश रैनाने देखील हार्ट इमोजी कमेंट केली आहे. सध्या हा व्हिडीओ व्हायरल देखील होतोय.

VIEW ALL

Read Next Story