Lok Sabha Nivadnuk 2024 LIVE: या राज्यातील सहा जिल्हयात एकही मत पडलं नाही

Lok Sabha Elections Voting Live Updates: देशातील लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आजपासून. 21 राज्यातील 102 जागांसाठी मतदान.   

Lok Sabha Nivadnuk 2024 LIVE: या राज्यातील सहा जिल्हयात एकही मत पडलं नाही

Lok Sabha Elections Voting Live Updates: देशात लोकशाहीचा उत्सव सुरु होत असून, त्यासाठी संपूर्ण भारत देश सध्या सज्ज झाला आहे. देशाचं भवितव्य ठरवणाऱ्या या निवडणुकीत मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे. 

महाराष्ट्रात रामटेक, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपुरात निवडणूकीच्या धर्तीवर मतदान पार पडणार असून, त्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. गडकरी, विकास ठाकरे, मुनगंटीवार, धानोरकरांसह बड्या नेत्यांचं भवितव्य इथं मतपेटीत बंद होणार आहे. तर, पूर्व विदर्भातल्या लढाईत आज फडणवीस, पटोले, वडेट्टीवार, पटेलांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचं पाहायला मिळणार असून, कोण बाजी मारणार याकडे साऱ्यांचंच लक्ष असेल.

19 Apr 2024, 11:04 वाजता

Lok Sabha Elections Voting Live Updates: कॉग्रेस पक्षाचाच विजय होईल- विश्वास किरसाण 

 गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातील कॉग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ नामदेव किरसाण यांनी गोंदिया जिल्यातील आमगाव येथे सपत्नीक मतदान केले. मतदारांनी मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले तर या निवडणुकीत कॉग्रेस पक्षाचाच विजय होईल असा विश्वास किरसाण यांनी व्यक्त केला.

19 Apr 2024, 10:35 वाजता

Lok Sabha Elections Voting Live Updates: नागरिकांनी निर्भयपणे मतदान करा- धर्मरावबाबा आत्राम 

राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रातील चेरपल्ली येथील शाळेत आपला मतदानाचा हक्क बजावला. या नक्षलग्रस्त भागात नागरिकांनी निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. उन्हाचा तडाखा बघता सर्वांनी पहिल्या काही तासातच मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले

19 Apr 2024, 10:24 वाजता

Lok Sabha Elections Voting Live Updates: एमएनएम प्रमुख, अभिनेते कमल हासन यांनी बजावला मतदानाचा हक्क 

ज्येष्ठ अभिनेते आणि एमएनएम प्रमुख कमल हासन यांनी चेन्नईतील कोएंबेडू येथील मतदान केंद्रात त्यांचा हक्क बजावला. हासन यांच्या राजकीय पक्षानं यंदा निवडणुकीत सहभाग घेतला नसून, या पक्षानं द्रमुकला पाठिंबा दिला आहे. 

19 Apr 2024, 10:15 वाजता

Lok Sabha Elections Voting Live Updates: गडचिरोलीत अद्याप मतदानाला सुरुवात नाही 

गडचिरोलीतील कुरखेडा मतदान केंद्रावर मतदान अद्यापही सुरू झालेलं नाही. मतदानास सुरुवात होऊनही 3 तास लोटले असले तरीही इथं मतदान सुरू झालेलं नाही. ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्याने मतदान प्रक्रिया रखडली असल्याची प्राथमिक माहिती इथं देण्यात येत आहे. 

19 Apr 2024, 10:12 वाजता

Lok Sabha Elections Voting Live Updates: टक्केवारीनुसार मतदान 

पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाल्यानंतर बिहारच्या चार जागांसाठी सकाळी 9 वाजेपर्यंत 7.66 वोटिंग झालं. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत 07.22 टक्के मतदान झालं. तर, नागपूर सकाळी नऊ पर्यंत सुमारे 08 टक्के आणि रामटेक सकाळी नऊ पर्यंत सुमारे 6 टक्के मतदान झालं. त्यामागोमाग गडचिरोलीमध्ये 8.43 आणि चंद्रपूरात 7.44 टक्के मतदान झालं. 

19 Apr 2024, 10:07 वाजता

Lok Sabha Elections Voting Live Updates: प्रफुल्ल पटेल यांनी गोंदियात केलं मतदान 

एनसीपी नेते प्रफुल्ल पटेल यांनी महाराष्ट्रातील गोंदिया येथे मतदान केलं. तर, नागपुरातील कोराडी ग्रामपंचायत मतदान केंद्रावर जात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मतदानाचा हक्क बजावलं. 

19 Apr 2024, 09:54 वाजता

Lok Sabha Elections Voting Live Updates: मतदान केल्यानंतर नितीन गडकरी यांची पहिली प्रतिक्रिया 

'लोकशाहीचा उत्सव अतिशय उत्साहात साजरा केला जात असून, देशातील नागरिक संविधानानं दिलेला अधिकार आणि त्यांचं कर्तव्य बजावतील अशी मला हमी आहे. मी नागपूरच्या मतदारांना आवाहन करतो, की तापमान वाढत आहे त्यामुळं इथं लवकरात लवकर येऊन मतदान करा. यंदाच्या वर्षी इथं 75 टक्के मतदान होईल असा मला विश्वास आहे', अशी प्रतिक्रिया नितीन गडकरी यांनी दिली. मी रेकॉर्डब्रेक मताधिक्याने विजयी होईन असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

19 Apr 2024, 09:22 वाजता

Lok Sabha Elections Voting Live Updates: अध्यात्मिक गुरु सदगुरू वासुदेव यांनी बजावला मतदानाचा हक्क

19 Apr 2024, 09:01 वाजता

Lok Sabha Elections Voting Live Updates:  स्टॅलिन यांनी केलं मतदान 

तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि डीएमके प्रमुख एम के स्टॅलिन यांनी चेन्नईतील मतदान केंद्रावर जात मतदानाचा हक्क बजावला. 

19 Apr 2024, 08:25 वाजता

Lok Sabha Elections Voting Live Updates: अभिनेते रजनीकांत यांनी केलं मतदान 

दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार आणि ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांनी चेन्नईतील मतदानकेंद्रावर जात तिथं मतदानाचा हक्क बजावला.