Tilak Verma: हार्दिक-तिलक वर्मा यांच्यात वादाची ठिणगी? रोहित शर्माला करावी लागली मध्यस्ती

Tilak Verma: असा दावा केला जातोय की, आयपीएलमधील एक सामन्यात हार्दिक आणि तिलक यांच्यामध्ये वाद झाला. हिटमेनिया 45 या इंस्टाग्रामवरील पेजवरून ही गोष्ट समोर आणण्यात आली आहे. 

सुरभि जगदीश | Updated: May 1, 2024, 10:56 AM IST
Tilak Verma: हार्दिक-तिलक वर्मा यांच्यात वादाची ठिणगी? रोहित शर्माला करावी लागली मध्यस्ती title=

Tilak Verma: यंदाच्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्सच्या टीमला फार काही चांगला खेळ करता आलेला नाही. मुंबईच्या टीमला या सिझनमध्ये 10 पैकी केवळ 3 सामने जिंकता आले आहेत. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली टीमची सुरुवात देखील फारशी चांगली झाली नाही. हार्दिकला कर्णधार केल्याने चाहते नाराज होते. यामुळे टीममध्ये 2 गट पडल्याचं म्हटलं जातं होतं. अशातच कर्णधार हार्दिक पंड्या आणि तिलक वर्मा यांच्यात भांडण झाल्याचं समोर आलं आहे. 

हार्दिक आणि तिलकमध्ये वाद?

असा दावा केला जातोय की, आयपीएलमधील एक सामन्यात हार्दिक आणि तिलक यांच्यामध्ये वाद झाला. हिटमेनिया 45 या इंस्टाग्रामवरील पेजवरून ही गोष्ट समोर आणण्यात आली आहे. या पोस्टमध्ये म्हटल्यानुसार, दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध झालेल्या सामन्यानंतर या दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली. यामध्ये हार्दिकने तिलकच्या एटीट्यूडवर प्रश्न उपस्थित केला. 

रोहित शर्माकडून करण्यात आली मध्यस्थी?

यावेळी या पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, या दोन्ही खेळाडूंमधील परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली होती की, अखेरीस रोहित शर्माला आणि टीममधील इतर खेळाडूंना यावेळी मध्यस्ती करावी लागली. यानंतर प्रकरण काहीसं शांत झालं. 

दोघांमधील वादाचं कारण काय?

दिल्लीकडून झालेल्या पराभवानंतर हार्दिक पंड्याने पोस्ट प्रेझेंटेशन सामन्यात तिलकचं नाव न घेता त्याच्या खेळीवर प्रश्न उपस्थित केले होते. यावेळी तो लेफ्ट आर्म स्पिनर्सविरूद्ध आक्रामक पद्धतीने खेळू शकला असता असं पंड्याने म्हटलं होतं. कदाचित यामुळे दोघांमध्ये वाद झाला असल्याचं म्हटलं जातंय. दरम्यान या पोस्टमध्ये किती तथ्य आहे याची खातरजमा झी 24 तास करत नाही.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Just Hitman Fc (@hitmania45)

मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या रेसमधून बाहेर?

मुंबई इंडियन्सला अजूनही प्लेऑफ गाठण्याची संधी आहे का, हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. मुंबईच्या टीमला जर प्लेऑफ गाठायचं असेल तर त्यांना उर्वरित सर्व सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहे. मुंबई इंडियन्सचा आगामी सामना हैदरबादविरुद्ध होणार आहे. याशिवाय केकेआर आणि लखनऊविरुद्ध एक एक सामना बाकी आहे. त्यामुळे आता मुंबईला प्लेऑफसाठी या दोन्ही संघांना कडवी टक्कर द्यावी लागेल. याशिवाय इतर टीमच्या रनरेटवरही मुंबईला अवलंबून रहावं लागणार आहे.