'टी-20 वर्ल्ड कपमध्ये अभिषेक शर्माला जर...', हरभजन सिंगने टोचले बीसीसीआयचे कान

IPL 2024 : युवा स्टार आक्रमक फलंदाज अभिषेक शर्मा याने लखनऊविरुद्ध खेळताना 28 बॉलमध्ये 75 धावांची खेळी केली.

| May 09, 2024, 17:45 PM IST

Harbhajan Singh on Abhishek Sharma : अभिषेक शर्मा याने 28 बॉलमध्ये 8 फोर अन् 6 सिक्स खेचले.

1/7

सनरायझर्स हैदराबादने लखनऊ सुपर जाएन्ट्सचा 10 गडी राखून खेळ खल्लास केला.

2/7

लखनऊने दिलेलं 165 धावांचं लक्ष्य हैदराबादने 9.4 ओव्हरमध्ये पूर्ण केलं.

3/7

अभिषेक शर्माच्या या वादळी खेळीमुळे त्याला आता टी-20 वर्ल्ड कपमध्ये घेण्याची मागणी होत आहे.

4/7

हरभजन सिंग याने बीसीसीआयला टॅग करत अभिषेक शर्माचं कौतूक केलं अन् मनातील भावना व्यक्त केली.

5/7

अभिषेकला टीम इंडियाच्या बेंच स्ट्रेथमध्ये सामील केलं जावं का? असा सवाल हरभजन सिंगने विचारला आहे.

6/7

हरभजन सिंगने यावेळी आयपीएल आणि बीसीसीआयला देखील टॅग केलं अन् आपलं मत नोंदवलं आहे.

7/7

दरम्यान, हैदराबादच्या विजयात अभिषेकचा मोठा वाटा राहिलाय. मात्र, तरी देखील त्याला वारंवार डावललं जात असल्याची टीका होतीये.